मालवण तालुक्यातील आंगणेवाडी ची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. या जत्रेसाठी जाणार्‍या भाविकांची संख्या पाहता कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत. या ट्रेनचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.  एलटीटी ते सावंतवाडी स्थानकादरम्यान दोन ट्रेन सोडल्या जाणार आहेत. ही ट्रेन 21 आणि 22 फेब्रुवारी दिवशी सोडली जाणार आहे. मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी.   

आंगणेवाडी जत्रा 2025 स्पेशल ट्रेन्स 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)