महारष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (16 मार्च) ठाणे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात उद्या 17 मार्च दिवशी तिथीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. आज तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात शिवरायांच्या नव्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मीडीयाशी बोलताना त्यांनी 'औरंगजेबाची निशाणी महाराष्ट्रात नको' हीच भावना आपली देखील असल्याचं म्हटलं आहे.
ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन
#WATCH | Maharashtra DCM Eknath Shinde inaugurated the memorial statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Thane. pic.twitter.com/Tg2H7qld5G
— ANI (@ANI) March 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)