IND vs ZIM 1st T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने अभिषेक शर्मा, रायन पराग आणि ध्रुव जुरेल यांना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली आहे. यापैकी अभिषेक आणि रायन पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत, तर ज्युरेलने यापूर्वीच कसोटी पदार्पण केले आहे. अभिषेकच्या पदार्पणाची माहिती कॅप्टन शुभमन गिलने आधीच दिली होती. अभिषेक शर्मा त्याच्यासोबत सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी घेणार असल्याचे गिलने सांगितले होते. सामना सुरू होण्यापूर्वी रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांचे टी-20 पदार्पणही निश्चित झाले आहे.
A round of applause for #TeamIndia Debutants from today! 👏👏
Go well 👌👌
Follow The Match ▶️ https://t.co/r08h7yfNHO#ZIMvIND | @IamAbhiSharma4 | @ParagRiyan | @dhruvjurel21 pic.twitter.com/tt1oeKem2u
— BCCI (@BCCI) July 6, 2024
Abhishek Sharma, Dhruv Jurel and Riyan Parag make their T20I debuts in Harare as India opt to bowl first #ZIMvIND
▶️ https://t.co/fOjVJcJz9M pic.twitter.com/8bfESFGdJ4
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)