Chandrika Dixit's Song Darji: दिल्लीची 'वडा पाव गर्ल' आजकाल एका सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियापासून बातम्यांपर्यंत सर्वत्र तिची चर्चा आहे. काही वेळापूर्वी ती एका आलिशान कारमधून खाली उतरताना दिसली होती. चंद्रिका दीक्षितने वडा पाव विकून एवढी महागडी कार खरेदी केली होती, अशी बातमी आली होती. मात्र, अनेकांनी ही गाडी दुसऱ्याची असल्याचे गृहीत धरले. इंदूरच्या चंद्रिका गेरा दीक्षितने सध्या दिल्लीच्या राणीबागमध्ये भाड्याने दुकान घेतले आहे. आता वडा पाव विक्रेता चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण तिचे नवीन गाणे यूट्यूबवर रिलीज झाले आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत गायक अमनदीप सिंग दिसत आहे. 'दर्जी' नावाचे हे गाणे असून, ते रिलीज होताच व्हायरलही झाले आहे.

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, प्रसिद्ध वडा पाव गर्ल कोणत्याही कार्यक्रमात रिबन कापण्यासाठी 50 हजार रुपये आकारते. ती म्हणते, लोक मला उद्घाटनासाठी बोलावतात आणि मी रिबन कापण्यासाठी 50 हजार रुपये घेते, यात काही चुकीचे नाही. (हेही वाचा: TikToker Noel Robinson थिरकला Amol Kamble सोबत 'गुलाबी शरारा' गाण्यावर सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)