Ulwe Coastal Road: मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) ते नवी मुंबई आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या 5.8 किमी लांबीच्या उलवे कोस्टल रोडच्या (Ulwe Coastal Road) बांधकामासाठी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाला (CIDCO) 3728 झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. हा सार्वजनिक महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. विकास प्राधिकरणाने उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले की, ते लादलेल्या सर्व अटींचे पालन करण्यास तयार आहेत. ही झाडे तोडण्याबाबतची नुकसानभरपाई म्हणून तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या तिप्पट वृक्षारोपण करण्यास सांगितले होते. त्यामुळे प्राधिकरणाने 11184 झाडे लावण्याचे मान्य केले आहे. (हेही वाचा: Fine on Mumbai Airport: मुंबई विमानतळाला ठोठावला 90 लाखांचा दंड; प्रवाशांनी रनवेवर रात्रीचे जेवण केल्याप्रकरणी BCAS आणि DGCA ची मोठी कारवाई)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)