Fine on Mumbai Airport: मुंबई विमानतळाला ठोठावला 90 लाखांचा दंड; प्रवाशांनी रनवेवर रात्रीचे जेवण केल्याप्रकरणी BCAS आणि DGCA ची मोठी कारवाई
नुकतेच इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाला अनेक तासांचा उशीर झाल्याची घटना समोर आली होती. हे विमान नंतर मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी मुंबई विमानतळावरील रस्त्यावरच रात्रीचे जेवण केले होते.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (Directorate General of Civil Aviation- DGCA) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (MIAL) ला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासह नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) द्वारे 60 लाख रुपये दंड ठोठावला आहे. अशाप्रकारे एकूण 90 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नुकतेच इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाला अनेक तासांचा उशीर झाल्याची घटना समोर आली होती. हे विमान नंतर मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी मुंबई विमानतळावरील रस्त्यावरच रात्रीचे जेवण केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई केली गेली आहे. डीजीसीएने सांगितले की, या बाबत कारणे दाखवा नोटीसचे उत्तर 17 जानेवारी रोजी प्राप्त झाले होते आणि ते समाधानकारक आढळले नाही, म्हणून हा दंड ठोठावला गेला आहे. मुंबई विमानतळ 2007 च्या हवाई सुरक्षा परिपत्रक 04 मध्ये नमूद केलेल्या सुरक्षा आवश्यकतांचे पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. (हेही वाचा: Aastha Special Trains: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर भारतीय रेल्वे चालवणार 200 आस्था स्पेशल ट्रेन; जाणून घ्या मार्ग आणि इतर तपशील)
Video of passengers eating on the tarmac at Mumbai Airport | A total of Rs 90 Lakhs fine imposed on MIAL - Rs 60 lakhs by Bureau of Civil Aviation Security (BCAS) and Rs 30 lakhs by DGCA. https://t.co/vhanRbcC9d
— ANI (@ANI) January 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2024 09:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

