हेटवणे पाणीपुरवठा लाईनवरील तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईतील अनेक भागात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने माहिती दिली आहे. ही देखभाल दुरुस्ती 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि 10 एप्रिल 2025 जी सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर, पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल. सुरुवातीला कमी दाबाने हा पाणीपुरवठा होईल. बाधित भागात पनवेल, कामोठे, तळोजा, खारघर, करंजाडे आणि जवळपासचे परिसर समाविष्ट आहेत. या काळात गैरसोय टाळण्यासाठी सिडकोने रहिवाशांना सहकार्य करण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या तात्पुरत्या विस्कळीततेनंतरही, शहरातील एकूण पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्याचे कारण नाही, कारण नवी मुंबईसाठी प्राथमिक जलस्रोत म्हणून काम करणाऱ्या मोरबे धरणात सध्या भरपूर पाणीसाठा असल्याची माहिती आहे. याबाबत 2 एप्रिल रोजी सहावाल समोर आला होता. (हेही वाचा: Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा! Morbe Dam धरणात 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा, परंतु पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन)
Navi Mumbai Water Cut:
Navi Mumbai Water Cut: CIDCO Announces 24-Hour Water Supply Suspension on April 9-10 Due to Maintenance Work; Check Timings and List of Affected Areashttps://t.co/2abSPEwkyR#NaviMumbai #WaterCut #CIDCO #Taloja #Kharghar #JNPTPort #WaterSupplyShutdown
— LatestLY (@latestly) April 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)