Cyber Crimes: मनोरंजनातून जागृती! 'हास्यजत्रा'ची क्लिप शेअर करत मुंबई पोलिसांचे केवायसी, ओटीपी आणि ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन (Watch)

मुंबई पोलिसांनी मराठी कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

Cyber Crimes: मनोरंजनातून जागृती! 'हास्यजत्रा'ची क्लिप शेअर करत मुंबई पोलिसांचे केवायसी, ओटीपी आणि ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन (Watch)
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जर का तुम्ही पेटीएम, गुगल पे, भीम अॅप किंवा नेट बँकिंगचा वापर करत असाल तर तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक प्राप्त करून, सीव्हीव्ही-ओटीपी किंवा केवायसीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सरकार वेळोवेळी याबाबत जनजागृती करत आहेच आता मुंबई पोलिसांनीही जनतेला ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी मराठी कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी केवायसी, ओटीपी, स्कीम आणि ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावधान, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.

याबाबत मुंबई पोलीस म्हणतात, ‘काय समजलिव? हे लक्षात ठेवाल ना? 'पृथ्वी'क वरून कोठूनही फसवणुकीचे 'प्रताप' होऊ शकतात, ऑनलाईन फसवणुकीच्या ज्ञानाचे "पारसमणी" असाल तरच 'शालू ची फिरकी' घेऊन वाचाल! केवायसी, ओटीपी, स्कीम आणि ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावधान! मनोरंजनातून जागृती!’ (हेही वाचा: Mahadev Betting App Case: मुंबई पोलिसांकडून Saurabh Chandrakar सह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; 15,000 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2023 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).