महादेव बेटिंग अॅप प्रकरणात 15,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी, महादेव बेटिंग अॅपची उपकंपनी असलेल्या खिलाडी अॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकरसह 32 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरनुसार, महादेव बेटिंग अॅप हे बेकायदेशीर जुगार अॅप होते. हे अॅप 2019 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि त्याद्वारे वापरकर्ते क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आणि इतर खेळांवर सट्टा लावत होते. कुर्ला न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्देशानंतर मंगळवारी माटुंगा पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला. एफआयआरमध्ये, तक्रारदार, माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी आरोप केला आहे की, 2019 पासून आतापर्यंत या ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सद्वारे सुमारे 15,000 कोटी रुपयांची फसवणूक केली गेली आहे. चंद्राकर हा छत्तीसगडमधील भिलाई येथील आहे. अंमलबजावणी संचालनालयासह अनेक एजन्सी या प्रकरणाचा तपास करत आहेत, तसेच या प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावले आहे. (हेही वाचा: Omegle Shuts Down: लोकप्रिय लाइव्ह व्हिडिओ चॅटिंग साइट ओमेगल बंद, तक्रारीनंतर कंपनीने घेतला निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)