Omegle Shuts Down: लोकप्रिय थेट व्हिडिओ चॅट साइट Omegle ने त्याच्या सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. Omegle 14 वर्षांपासून आपली सेवा देत आहे. ऑनलाइन गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ओमेगलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या काळात Omegle वापरणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. Omegle वर मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्व प्रकारचे वापरकर्ते होते. कंपनीचे संस्थापक लीफ के ब्रूक्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वेबसाइट ऑपरेट करणे यापुढे आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या टिकाऊ नाही.
Omegle has officially shut down after 14 years. pic.twitter.com/agGJkd65KV
— Pop Base (@PopBase) November 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)