MPSC Mandatory Aadhaar-Based KYC: एमपीएससीचा महत्वाचा निर्णय; परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे.

MPSC Mandatory Aadhaar-Based KYC: एमपीएससीचा महत्वाचा निर्णय; परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक
MPSC | (File Photo)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे:

  • आधार ऑनलाईन ई-केवायसी,
  • आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी,
  • आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी,
  • नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करता येणार आहे.

अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. (हेही वाचा: UPSC Pratibha Setu Initiative: यूपीएससीचा प्रतिभा सेतू उपक्रम; अंतिम यादीत स्थान न मिळालेल्या 10,000 हून अधिक उमेदवारांसाठी दुसरी संधी, जाणून घ्या काय आहे योजना)

MPSC Mandatory Aadhaar-Based KYC:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 11:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).