पुण्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत असून, यामुळे शहरातील नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. परिणामी आता पुरपरिस्थितीची शक्यता (Flash Flood Risk Pune) आहे. खडकवासला, पानशेत आणि मुळशी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून, नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. पीएमसी कडून नागरिकांना आपल्या गाड्या बाहेर काढण्याचा इशारा दिला जात आहे. नक्की वाचा: उद्याचे हवामान महाराष्ट्र: 1 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि साताऱ्यात पावसाची स्थिती .

पुण्यात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)