जळगाव मध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत, आणि अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहू लागल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान तापी नदीवरील हतनूर धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे खालच्या भागातील नद्यांच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष देऊन आहे. पारोळा तालुक्यातील चोरवड मध्ये अंजली नदीला मोठा पूर आल्याने चोरवडला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे पारोळा-भडगाव मार्गावरील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.
जळगाव मध्ये पावसाचा कहर
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड येथे अंजली नदीला मोठा पूर आलाय. चोरवडला पूल पाण्याखाली गेल्यामुळे पारोळा-भडगावचा संपर्क तुटला आहे.#LokmatNews #MarathiNews #Jalgaon #Parola pic.twitter.com/sgmZ7QJdjQ
— Lokmat (@lokmat) July 31, 2026
भडगाव तालुका – मौजे बात्सर येथील बचाव कार्य
भडगाव तालुक्यातील मौजे बात्सर येथे मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने ५ लहान बालके व ३ महिला घरात अडकून पडल्या होत्या. माहिती मिळताच प्रशासनाने, व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून यशस्वी बचाव कार्य राबविले. pic.twitter.com/6hg3Cl4c2m
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 31, 2026
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)