MPSC Exam Postponed: पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख लवकरच जाहीर होणार
पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.
25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्याने स्पर्धा परीक्षा देणार्यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं. अशाप्रकारे परीक्षांच्या तारखांमधील संघर्ष टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. आज त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे असे एमपीएससी ने म्हटलं आहे. पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.
MPSC ची 25 ऑगस्टची परीक्षा गेली पुढे
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra https://t.co/uLEWi1xBoE
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2024 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

