Rajasthan Accident: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बसचालकाच बस वरिल नियत्रंण सुटल्याने बसचा अपघाता झाला आहे. ब्रिजवरील रेलिंग तोडून बस थेट रेल्वे ट्रॅकवर येऊन कोसळल्याने मोठा घात झाला आहे. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस मध्ये 35 ते 40 प्रवाशी होते. ज्यातील 28 प्रवाशी जखमी झाले आहे. जवळच्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे. रविवारच्या मध्यरात्री हा अपघात झाला. बस ही हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जात होती.
#WATCH Rajasthan: Four people died, and several injured after a bus lost its control and fell on the railway track near Dausa Collectorate Circle. All the injured have been taken to the hospital. (05/11) pic.twitter.com/Xge5qLT9My
— ANI (@ANI) November 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)