Accident On Samruddhi Expressway: समृद्धी एक्स्प्रेस वेवरील अपघातात मुंबईतील डॉक्टर ठार, 4 जखमी

कार जालन्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर आली, तेव्हा ड्रायव्हरने ट्रकला धडक दिली आणि समोर बसलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला.

Accident On Samruddhi Expressway: समृद्धी एक्स्प्रेस वेवरील अपघातात मुंबईतील डॉक्टर ठार, 4 जखमी
Accident (PC- File Photo)

Accident On Samruddhi Expressway: समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) सुरू झाल्यापासून या रोडवर अनेक अपघात (Accident) झाल्याच्या घटना समोर येत आहे. जालन्यातील (Jalna) समृद्धी एक्स्प्रेस वेवर कार ट्रकला धडकल्याने मुंबईतील 50 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी सकाळी डॉ. अब्दुल खलीक हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह आपल्या गावी अमरावती येथे आपल्या कुटुंबासह ईद साजरी करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. (हेही वाचा -Viral Video: मोटारसायकलवर धोकादायक स्टंट करणाऱ्या दोन तरुणाविरोधात व्हिडिओवरून वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, Watch)

कार जालन्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर आली, तेव्हा ड्रायव्हरने ट्रकला धडक दिली आणि समोर बसलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे. कारमधील इतर चार जणांवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात सिंदखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक केशव वाघ यांनी माहिती दिली आहे. डॉक्टरांचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेने डॉ. अब्दुल खलीक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2023 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).