Delhi Building Collapse: दिल्लीतील (Delhi) नबी करिम परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य आणि पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. ढिगारा उचलण्याचे काम सुरु आहे. (हेही वाचा- गुजरातच्या सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळली; 12 हून अधिक जण जखमी, अनेकजण अडकल्याची भीती)

 दिल्लीतील इमारत कोसळली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)