Building Collapse In Surat: गुजरात (Gujarat) मधील सूरतमध्ये सततच्या पावसात 6 मजली घर कोसळल्याने (Building Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. सुरतमधील सचिन पाली भागात 6 मजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्यामुळे 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इमारत स्लम बोर्डाची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
ताज्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली आणखी तीन जण गाडले गेल्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. अद्याप मृत्यूची नोंद नाही. जीर्ण इमारत रिकामी करण्यासाठी प्रशासनाकडून तीन महिन्यांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. (हेही वाचा -IED Blast On Rajnandgaon-Maharashtra Border: राजनांदगाव-महाराष्ट्र सीमेवर IED स्फोट; 2 जवान जखमी)
#Surat pic.twitter.com/Y9Ehigoqe4
— NDTV (@ndtv) July 6, 2024
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती याआधी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. अचानक कोसळलेल्या इमारतीत काही लोक भाडेकरू म्हणून राहत होते. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.