दिल्ली-मुंबई प्रवास करणार्‍या Akasa Air Flight च्या एका महिला प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Yashi Singh असं या महिला प्रवाशाचं नाव असून तिच्याकडे 22 लाईव्ह आणि एक रिकामं काडतूस सापडलं आहे. या महिलेकडे त्या बाबतची कोणतीही कागदपत्रं नाहीत. दरम्यान दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या विरोधात Section 25 Arms Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई एका एमरिट्सच्या प्रवाशावर देखील केली होती. नक्की वाचा: Delhi-Dubai Emirates Flight च्या एका प्रवाशाकडे आढळली 6 जीवंत काडतुसं; पोलिसांनी घेतलं ताब्यात. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)