गेल्या काही दिवसांत भारत-म्यानमार सीमेजवळ म्यानमार लष्कर आणि लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या सैन्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. अशात आता भारताने मंगळवारी म्यानमारमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सुचना जरी केल्या. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, म्यानमारमधील सध्याची परिस्थितीत लक्षात घेता, देशात आधीच राहणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि हिंसाचाराने प्रभावित भागात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच रस्त्याने आंतरराज्य प्रवास देखील टाळावा. भारताने म्यानमारमध्ये राहणाऱ्या अल्पमुदतीचे पर्यटक वगळता सर्व भारतीय नागरिकांना यंगूनमधील भारतीय दूतावासात नोंदणी करण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘दूतावासात नोंदणी केल्याने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत होईल.’ मंत्रालयाने म्यानमारमधील भारतीयांना वेबसाइटवर उपलब्ध नोंदणी फॉर्म डाउनलोड करून भरण्यास सांगितले आहे आणि त्याच्या हार्ड आणि सॉफ्ट कॉपी दूतावासाला पाठवण्यास सांगितले आहे. भारत-म्यानमार सीमेवर झालेल्या लढाईमुळे शेजारील देशातील नागरिकांची भारतीय सीमेवर ये-जा वाढली आहे. (हेही वाचा: Israel Lists Lashkar -e- Taiba as a Terror Organization: Mumbai Terror Attacks च्या 15 व्या स्मृतिदिना निमित्ताने Embassy of Israel in India ने दिली महत्त्वाची अपडेट)
Advisory for Indian nationals in Myanmar:https://t.co/oUQxjHz3K3 pic.twitter.com/YkT69hFUwF
— Arindam Bagchi (@MEAIndia) November 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)