मंगळवारी सकाळी मिझोरामची (Mizoram) राजधानी आयझॉलच्या बाहेरील लेंगपुई विमानतळावर (Lengpui Airprt) म्यानमारच्या लष्कराचे (Myanmar Army) विमान कोसळले, त्यात विमानातील आठ जण जखमी झाले. मिझोरामहून आपल्या सैनिकांना परत घेण्यासाठी आलेले विमान विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानात चालक दलासह 14 जण होते. "विमान लहान आकाराचे आहे, वैमानिकासह 14 लोक त्यात होते, आठ जण जखमी झाले असून सहा जण सुरक्षित आहेत. जखमींना तातडीने लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे," असे मिझोराममधील एका अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना कशी घडली याबाबत अधिकाऱ्याने मात्र अधिक माहिती दिली नाही.

पाहा पोस्ट -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)