BEST Electric Taxi Fake News (Photo Credits: Twitter)

बेस्ट (BEST) कडून लवकरच  'इलेक्ट्रिक टॅक्सी' (Electric Taxi) सेवा सुरु करण्यात येणार असल्याचा मेसेज फोटोसहीत सध्या व्हायरल (Viral) होत आहे. एका लाल रंगाच्या मोटार कार वर बेस्टचा लोगो असलेला फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यात बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी असा उल्लेखही केला असून या फोटोत चालकाचा गणवेश परिधान केलेला एक व्यक्तीही दिसत आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र खुद्द बेस्ट प्रशासनाने यामागील सत्याचा खुलासा केला आहे. यासाठी बेस्टने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. (Fact Check: मोदी सरकार नागरिकांच्या खात्यात 2 लाख 67 हजार रुपये जमा करत असल्याचा मेसेज व्हायरल; PIB ने केला खुलासा)

व्हायरल होणारा फोटो:

त्यानंतर बेस्टने निवेदन जारी करत नागरिकांचा गैरसमज दूर केला आहे. निवेदनात बेस्टने म्हटले की, "अशा प्रकारची कोणतीही टॅक्सी सेवा बेस्ट उपक्रमाद्वारे सुरु करण्यात आलेली नसून नजिकच्या काळातही तशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे अशा प्रकराच्या कोणत्याही छायाचित्र किंवा मजकुरावर विश्वास ठेवू नका."

BEST Tweet:

दरम्यान, कोविड-19 संकटकाळात लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती. त्यामुळे बेस्टने सर्व मुंबईकरांचा प्रवास सुरळीत करण्याची जबाबदारी सांभाळली. मात्र आता बेस्टची इलेक्ट्रिक टॅक्सी सुरु होणार असल्याचे सांगत मेसेजद्वारे नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बेस्टने केले आहे.