PIB Debunks Fake News (Photo Credits: Twitter/@PIBFactCheck)

करोना व्हायरसमुळे कोविड 19 आजाराबद्दल सामान्यांच्या मनात दहशत आहे. त्याचाच गैरफायदा घेत मागील काही दिवसात सोशल मीडियामध्ये अनेक खोट्या बातम्या झपाट्याने पसरत आहेत. प्रामुख्याने व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबूकवर या बातम्या व्हायरल होत आहेत. सध्या कोरोना संकटकाळात भारत सरकार प्रत्येक नागरिकाला 2000 रूपये देणार असल्याचे एक खोडसाळ वृत्त व्हायरल होत आहे. दरम्यान या वृत्तासोबत एक बिटली लिंकदेखील आहे. त्यावर क्लिक करा आणि पैसे मिळवा असेदेखील त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. हा निधी केवळ एकदाच मिळेल असे देखील त्यामध्ये म्हटलं आहे. Fact Check: नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 10000 रुपयांची स्कॉलरशिप देत आहे? PBI ने सांगितले व्हायरल पोस्टमागील सत्य

दरम्यान आता पीआयबी फॅक्टच्या ट्वीटर अकाऊंटवरून व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारत सरकारने असा कोणताही निधी किंवा पॉलिसी मंजूर केलेली नाही. मेसेज सोबत खोटी लिंक जोडण्यात आली आहे. अशा फेक न्यूजपासून दूर रहा. असे आवाहन करण्यात आले आहे.

PIB Tweet

व्हॉट्सअप वरील एका संदेशामध्ये असा दावा करण्यात आला आहे की सरकारने प्रत्येक नागरिकाला दोन हजार रुपयांची मदत देण्याची योजना मंजूर करुन निधी वाटप सुरू केले आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचा खुलासा PIB Fact check ने करत  देण्यात आलेली लिंक खोटी आहे. अशा प्रकारची खोटी संकेतस्थळे आणि व्हॉट्सअप मेसेज पासून सावध राहा. असं ट्विट केलं आहे.  

 

तुम्हांलाही व्हॉट्सअ‍ॅपवर अशाप्रकारे भारत सरकार 2 हजार रूपये देत असल्याचं वृत्त किंवा मेसेज मिळाले असेल तर त्यापासून दूर रहा. कोरोना संकट काळात घडणार्‍या घडामोडी, भारत सरकारकडून जाहीर केल्या जाणार्‍या सुविधा यांची माहिती मिळवण्यासाठी अधिकृत साईट्स, स्त्रोत यांच्यावरच विश्वास ठेवा.