Fake News Claiming Rs 10,000 for College Students (Photo Credits: Twitter, PIB)

संपूर्ण देश कोविड-19 (Covid-19) संकटाशी लढा देत असताना सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून म्हणजेच फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp) अनेक फेक न्यूज (Fake News), चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे लोकांच्या अस्वस्थतेत भर पडत आहे. अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (National Scholarship Portal) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 10000 ची स्कॉलरशिप देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (Relief Fund म्हणून प्रत्येक नागरिकाला 7,500 रुपये मिळणार? व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजचा PIB Fact Check कडून खुलासा)

नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 10000 ची स्कॉरलशिप देत असल्याचे व्हायरस मेसेजमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने पीआयबी कडून यामागील सत्यता तपासण्यात आली. त्यानंतर हा मेसेज फेक असल्याचे उघड झाले. याची माहिती पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. हा मेसेज फेक असून अशा प्रकारच्या फेक वेबसाईटपासून सावध रहा, असे पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

PIB Fact Check Tweet:

कोरोना व्हायरसच्या काळात अनेक फेक न्यूज जोर धरु लागल्या असल्या तरी अशा प्रकारच्या माहितीवर विश्वास ठेवणे टाळा. विशेष म्हणजे अशा न्यूज फॉरवर्ड करणे थांबवा त्यामुळे बऱ्याच समस्या कमी होण्यास मदत होईल. तसंच सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही योग्य आणि खरी माहिती मिळवू शकता.