कोविड-19 (Covid-19) च्या कठीण काळात नागरिकांना दिलासा देणारा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) व्हायरल (Viral) होत आहे. नागरिकांना रिलिफ फंड म्हणून 7500 रुपये मिळणार असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यात एक लिंकही दिली आहे. FG ने याला परवानगी दिली असून त्यानुसार आता प्रत्येक नागरिकाला 7500 रुपये रिलिफ फंड (Relief Fund) मिळणार आहे. हा रिलिफ फंड मिळवण्यासाठी काय करावे हे देखील त्या मेसेजमध्ये सांगितले आहे. तसंच हे पैसे केवळ एकदाच मिळणार असून मर्यादीत लोकांनाच याचा लाभ मिळणार असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे.
हा मेसेज व्हॉट्सअॅपवर वेगाने फॉरवर्ड होत आहे. त्यामुळे कोणीतरी या मेसेजमागील सत्यता जाणून घेण्यासाठी PIB Fact Check च्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबरला मेसेज फॉरवर्ड केला. दरम्यान मेसेजमध्ये असलेल्या स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुकांमुळे मेसेज फेक आहे, हे कळून येते आणि पीआयबी फॅक्ट चेककडूनही मेसेज फेक असल्याचा खुलासा करण्यात आला. पीआयबीने ट्विट करत ही माहिती दिली. "फेक. मेसेजमध्ये फेक लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे अशा फेक वेबसाईट आणि व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्सपासून सतर्क रहा," असे ट्विटमध्ये म्हटले आहे. (Fact Check: भारतामध्ये 15 जून पासून पुन्हा लॉकडाऊन करत ट्रेन, विमान सेवा थांबवणार असल्याच्या बातम्या खोट्या; पहा PIB ने केलेला खुलासा)
PIB Fact Check Tweet:
Claim- A whatsapp viral message claims to offer free Rs 7500 relief fund to each citizen.#PIBFactcheck: #Fake. The fraud link given is a Clickbait. Beware of such Fraudulent websites and whatsapp forwards. pic.twitter.com/qvaeDODsWk
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 10, 2020
कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटात सोशल मीडियावर फेक न्यूज, चुकीच्या माहितीचा भडिमार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे चुकीचे आहे. कोणत्याही गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय सरकारी योजना आणि स्किम्स वर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता आहे, माहितीची सत्यता जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकच्या pib.nic.in किंवा लेटेस्टलीला भेट द्या.