भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) आता पाचव्या टप्प्यामध्ये आहे. 30 जूनपर्यंत असणारा हा लॉकडाऊन आणि अनलॉकचा पहिला टप्पा देशभर विविध अटी आणि सवलतींच्या माध्यामातून सुरू आहे. पण आता वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुन्हा 15 जून पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करू शकतं आणि त्याच्या अंतर्गत टप्प्या टप्प्याने सुरू झालेली देशांर्गत रेल्वे आणि विमानप्रवास आता पुन्हा बंद होऊ शकतो असा दावा करणारा एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र पीआयबी या सरकारी वृत्तसंस्थेना हा दावा खोटा असल्याचं सांगत अशा भ्रामक फोटोपासून सावधान रहा असा इशारा दिला आहे. BMC Guidelines: मुंबईत सोमवार- शनिवार दरम्यान मार्केटसह दुकाने सुरु करण्यास परवानगी; मार्केट कॉम्पेक्स आणि मॉल्स राहणार बंद.
दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरायला सुरूवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामध्ये सारा देश ठप्प झाला. मात्र हळूहळू स्थलांतरित मजुर, अडकलेले पर्यटक, वैद्यकीय उपचारांसाठी एका राज्यातून दुसर्या राज्यात जाणार्या नागरिकांना हवाई आणि रेल वाहतूक सुरू झाली. दरम्यान जशी वर्दळ वाढली तशी कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढदेखील झाली. मात्र आज कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्णांपेक्षा या आजारावर मात केलेल्यांची संख्या अधिक असल्याचं सकारात्मक चित्र देखील पहायला मिळालं आहे. त्यामुळे 30 जून नंतर लॉकडाऊनचा पाचवा टप्पा संपल्यानंतर काय? याबाबत सरकार विचाराधीन आहे. योग्य वेळी सराकारकडून त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. Lockdown: महाराष्ट्रात 30 जूननंतर पुन्हा लॉकडाउन वाढणार? पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
PIB Tweet
दावा: सोशल मीडिया पर फैलाई जा रही एक फोटो में दावा किया जा रहा है कि गृह मंत्रालय द्वारा ट्रेन और हवाई यात्रा पर प्रतिबंध के साथ 15 जून से देश में फिर से पूर्ण लॉकडाउन लागू किया जा सकता है।#PIBFactcheck- यह #Fake है। फेक न्यूज़ फैलाने वाली ऐसी भ्रामक फोटो से सावधान रहें। pic.twitter.com/DqmrDrcvSz
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 10, 2020
भारतामध्ये अजूनगी कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांसाठी कडक नियम आहेत. दरम्यान कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसल्याने तसेच या आजारावर अजूनही ठोस औषध किंवा लस नसल्याने नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळतच पुढील काही काळ जगायला शिकायचं आहे. पंतप्रधान मोदींनीही कोरोनासोबत जगायला शिका असं आवाहन भारतीयांना केलं आहे. मात्र या कोरोनाच्या भीतीचं भांडवल करत काही जण खोटासाळपणा करत असल्याचं, खोट्या बातम्या पसरवत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मात्र अशा फेक न्यूजपासून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन वारंवार करण्यात आलं आहे. तसेच सरकारी सुत्रांकडून मिळालेल्याच माहितीवर विश्वास ठेवावा असे देखील आवाहन करण्यात आलं आहे.
सद्यस्थितीमध्ये भारतात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 276583 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 133632 इतकी आहे तर 135206 जणांनी कोरोनावर मात केली आहे.