BMC Guidelines: मुंबईत सोमवार- शनिवार दरम्यान मार्केटसह दुकाने सुरु करण्यास परवानगी; मार्केट कॉम्पेक्स आणि मॉल्स राहणार बंद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर Mission Begin Again नुसार लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातील नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात सोमवार पासून धार्मिक स्थळ, हॉटेल्स, बस सेवा आणि ऑफिसे सुरु करण्यात आली आहेत. त्यानंतर आता मुंबई महापालिकेकडून एक नवी मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत मार्केट परिसर आणि मार्केटसह दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पण ती सोमवार ते शनिवार या दिवसात सुरु राहणार असून त्यांच्या कामाच्या वेळेत उघडी ठेवण्यात येणार आहेत. परंतु महापालिकेने मार्केट कॉम्पेक्स आणि मॉल्स सध्या तरी बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात 31 ते 40 वयोगटातील लोकांना COVID-19 ची सर्वाधिक लागण, पाहा वैद्यकिय विभागाचा रिपोर्ट)

Phase नुसार काही गोष्टी आता हळूहळू सुरु करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. दुकाने सुरु करण्याबाबत सुद्धा अधिक स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने एक दिवस सुरु तर दुसऱ्या बाजूची एक दिवस बंद अशा पद्धतीने काम करणार आहेत. दुकानदारांनी दुकाने सुरु केल्यानंतर ट्राफिकचे नियोजन आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. मात्र दुकाने रविवारी बंद राहणार असल्याचे ही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.(Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद)

>>मुंबई महापालिकेची नवी मार्गदर्शक सुचना

दरम्यान, नागरिकांना आता घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार हे खरे. त्याचसोबत नियमांचे सुद्धा पालन करणे अत्यावश्यक असणार आहे. यापूर्वी सुद्धा सरकारने गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन केले होते. त्यामुळे नागरिकांनी आता सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवून वागावे अशी अपेक्षा केली जात आहे. कोरोनाच्या एकूणच परिस्थिबाबत बोलायचे मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पार गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.