Japan's Mount Aso Volcano: जपानमध्ये 'माउंट आसो' ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात 2.17 मैलपर्यंत पसरली राख, पहा थक्क करणारा Viral Video
Volcano Mount Aso in Japan (संग्रहित संपादित प्रतिमा)

बुधवारी जपानच्या (Japan) दक्षिणेकडील क्युशू बेटावर (Kyushu Island) 'माउंट आसो' नावाचा ज्वालामुखी (Volcano Mount Aso) फुटला. देशाच्या हवामान संस्थेने सांगितले, हा ज्वालामुखी इतका मोठा होता की त्याची राख आकाशात 3,500 मीटर (2.17 मैल) पर्यंत पसरली आहे. एजन्सीने सांगितले की सकाळी 11:43 च्या सुमारास या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यामध्ये आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. ज्या ठिकाणी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला ते ठिकाण एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या उद्रेकानंतर लोकांना पर्वतांच्या जवळ जाऊ नका असे सांगण्यात आले आहे. पर्वताच्या नाकाडेक क्रेटरपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर मोठे ज्वालामुखीय ब्लॉक आणि राख विखुरल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. एजन्सीच्या मते, कुमामोटो प्रांतातील 1592 मीटर (5,222 फूट) उंच पर्वतावरून राख पडत आहे बुधवारी दुपारपासून ती आजूबाजूच्या शहरांवरही पडण्यास सुरवात होईल. 2019 मध्ये देखील माउंट आसो येथे एक छोटासा स्फोट झाला होता आणि सप्टेंबर 2014 मध्ये माउंट ओंटेकवर 63 लोकांचा मृत्यू झाला होता, जी जवळजवळ 90 वर्षांतील जपानमधील सर्वात वाईट ज्वालामुखी आपत्ती होती.

घटनेच्या वेळी डोंगरावर किती लोक उपस्थित होते याचा शोध घेण्याचा सरकार आता प्रयत्न करत आहे. दरम्यान, माउंट आसो हा जपानमधील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे आणि जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखींपैकी एक आहे. हा क्युशू बेटावर कुमामोटो प्रांतातील आसो कुजो राष्ट्रीय उद्यानात आहे. ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक असते. ज्यामधून, पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस (मॅग्मा), उष्ण वायू, राख इत्यादी बाहेर पडतात. पृथ्वीवरील सुमारे 500 ज्वालामुखी सक्रिय आहेत. (हेही वाचा: भारताचे मिशन Chandrayaan-2 चे मोठे यश; ऑर्बिटरने लावला चंद्रावरील पाण्याचे रेणू आणि हायड्रॉक्सिलचा शोध)

दुसरीकडे गेल्या महिन्यात स्पेनमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला. इथली परिस्थिती अद्याप सामान्य झाली नाही. कॅनरी बेटांवर ला पाल्मा ज्वालामुखीच्या नुकत्याच झालेल्या स्फोटानंतर लाव्हाचा प्रवाह वेगाने वाढत आहे. त्याच्या प्रवाहाच्या नवीन दिशेबरोबरच अटलांटिक महासागराच्या दिशेने इतर क्षेत्रांनाही धोका निर्माण झाला आहे.