Volcano Erupted in Southwest Iceland: नैऋत्य आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक (Watch Video)
Iceland Volcano | (Photo Credits: YouTube)

नैऋत्य आईसलँडवरील (Volcano Erupted in Southwest Iceland) नागरिकांना निसर्गाच्या एक धक्कादायक प्रकोपाला रविवारी (14 जानेवारी) सामोरे जावे लागले. येथील एका फिशिंग टाऊनमध्ये दुपारनंतर अचानक लाव्हा उद्रेक झाला. जमीनीच्या पोटातून उसळलेला लाव्हारस शहरातील विविध भागांमध्ये पसरला. आइसलँडची राजधानी आणि सर्वात मोठे शहर असलेल्या रेक्जाविक (Capital Reykjavik) शहरासह ग्राईंडविक (Grindavik) मध्येही ज्वालामुखीचा उद्रेक पाहायला मिळाला. स्थानिक प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, परिस्थितीचे गांभार्य ओळखून आणि संभाव्य आपत्ती आणि त्यामुळे निर्माण होणारा धोका विचारात घेऊन शहरांतील बहुतांश भाग रिकामा करण्या आला होता. त्यामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही. मात्र, भौतिक हानी मोठ्या प्रमाणावर झाली. शहरांतील अनेक घरांना लाव्हारसाचा फटका बसला. निसर्गाच्या या प्रकोपाचा व्हिडिओ शेअर करत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे.

शहरात पसरला लाव्हा

नैऋत्य आईसलँडवरील ग्राईंडविक (Grindavik) शहर हे लाव्हारसाच्या ज्वाळांनी होरपळून निघाले. जमीनीखालून वर येणारे आणि जमीनीच्या पृष्ठभागावर उसळणारे लाव्हारसाचे कारंजे. त्यासोबत येणारी राख, धूर आणि अनेक विषारी वायूंनी आकाश काळवंडून गेले. शहरातील जमीनीवर माती, राख, दगड, खडक यांचा ढिगारा साचला होतात. ज्वालामुखीच्या रुपात तप्त लाव्हा शहरातील जमीनीच्या पृष्ठभागावर पसरल्याने जमीन आणि आकाशात काळोखी दाठली होती. शहरातील स्थानिक प्रसारमाध्यम असलेल्या मार्गनब्लॅडीड (Morgunbladid) या प्रसारमाध्यमाने या घटनेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. (हेही वाचा, Volcano Lava Live Video: भयावह! आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा व्हिडिओ)

जीवितहानी नाही मात्र इमारतींना धक्का

आइसलँडचे शहराध्यक्ष गुडनी जोहानेसन यांनी सोशल मीडिया साइट 'X' वर सांगितले की, या नैसर्गिक घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्यापपर्यंत नोंद झाली नाही. मात्र, असे असले तरी पायाभूत सुविधांना नक्कीच मोठा धोका निर्माण झाला आहे. काही पायाभूत सुविधा कही ठिकाणी कोलमडली आहे. शहराच्या उत्तरेकडील भागात सविवारी लाव्हाच्या उद्रेकाची सुरुवात झाली. त्यानंतर शहराच्या इतर परिसरातही भूकंप होईल, अशी चिन्हे आणि परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षीतत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते. (हेही वाचा, Philippines Taal Volcano: फिलीपिन्समधील 'ताल' ज्वालामुखी उद्रेकाच्या मार्गावर; सरकारकडून हाय अलर्ट जारी, हजारो लोकांचे स्थलांतर)

आइसलँडची राजधानीस मोठा फटका

गुडनी जोहानेसन यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राजधानी रेकजाव्हकच्या नैऋत्येस सुमारे 40 किमी (25 मैल) अंतरावर असलेल्या ग्रिन्डाविकपर्यंत लावा पोहोचण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने अलिकडेच काही उपाययोजना केल्या होत्या. ज्यामध्ये अशी स्थिती निर्माण झाली तर लाव्हा शहरापर्यंत पोहोचू नये यासाठी मोठे दगड आणि इतर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन अडथळे निर्माण करण्यात आले होते. मात्र, तहीही हे अडथळे पार करत लाव्हा शहरापर्यंत पोहोचला. वाचकांच्या माहितीसाठी असे की, रेक्जाविक (Capital Reykjavik) ही आइसलँडची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे.

व्हिडिओ

ज्वालामुखी हॉटस्पॉट

नैऋत्य आइसलँडमधील रेकजेनेस द्वीपकल्पातील एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत झालेला हा दुसरा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. आकडेवारी पाहिली तर सन 2021 नंतर या प्रदेशात झालेला हा पाचवा ज्वालामुखी आहे.