भारतामध्ये आता एकापाठोपाठ एका मोठ्या सणांची धामधूम सुरू होत आहे. पण त्याआधीच आता सोशल मीडियामध्ये खोट्या बातम्यांचा ओघ सुरू झाला आहे. कोविड 19 शी सामना करत आता हळूहळू आयुष्य पूर्ववत झालं आहे. पण त्यामध्येच आता सोशल मीडीयात एक मेसेज शेअर केला जात आहे त्यामध्ये 'चीन कडून अस्थमा (Asthma) आजार वाढवण्यासाठी विशिष्ट फटाके तर डोळ्याचे आजार वाढवण्यासाठी विशेष प्रकाश सजावटीची रोषणाई (Lights) बनवली जात आहे. त्यामुळे चीनी उत्पादनांपासून दूर रहा' असं भारत सरकारने आवाहन केले आहे. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेज भारताच्या गृह मंत्रालयाने दिलेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान वायरल मेसेज मध्ये असा दावा करण्यात आला आहे की या चीनी फटाक्यामध्ये विषारी कार्बन मोनोक्साईड आहे. त्यामुळे दिवाळीत फटाके उडवताना यापासून दूर रहा. तसेच हा मेसेज जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहचवा. पण केंद्र सरकारने अशा अलर्टचं वृत्त फेटाळलं आहे. Fact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र? Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य.
PIB Fact Check
गृह मंत्रालय के नाम से भेजे जा रहे एक फर्जी मैसेज में दावा किया जा रहा है कि चीन भारत में अस्थमा और नेत्र रोग कारक विशेष प्रकार के पटाखे और सजावटी लाइट भेज रहा है।#PIBFactcheck
▪️ गृह मंत्रालय द्वारा ऐसी कोई सूचना नहीं दी गई है।
▪️ कृपया ऐसे फर्जी सन्देशों को साझा न करें। pic.twitter.com/dd7n64eZxG
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 29, 2021
भारतामध्ये मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. अनेकांनी इको फ्रेंडली फटाके वापरण्याचादेखील सल्ला दिला होता. अद्याप महाराष्ट्रासह देशातही दसरा, दिवाळीच्या अनुषंगाने काही वेगळी नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळी नियमावली जाहीर करतात.