नागपूर: रात्री 10 नंतर फटाके फोडले; 63 जणांवर पोलिसांची कारवाई
फटाके (संग्रहित, संपादित प्रतिमा)

फटाके फोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या 63 जणांविरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने फटाके फोडण्यावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. तसेच, जर दिवाळी उत्सव काळात फटाके फोडायचे असतीलच तर, रात्री 8 ते 10 या कालावधीत फोडावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, न्यायालयाच्या या निर्देशाचे उल्लंघन करत नागपूर येथील काही लोकांनी रात्री 10 नंतर फटाके फोडले. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी दिवाळी उत्सव काळात फटाके फोडण्यावर राज्य सरकारने बंदी घातली होती. या बंदीविरोधात विविध संघटनांनी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात होती होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देत फटाके फोडण्यावरील बंदी कायम ठेवली. तसेच, फटाके फोडायचेच असतील तर, त्यासाठी घालून दिलेल्या विशिष्ट नियम आणि कालावधीचे निर्देशांचे पालन करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. (हेही वचाा,  कायदा मोडून फटाके फोडले; मुंबईत पहिला गुन्हा दाखल; पोलीस आरोपींच्या शोधात)

दरम्यान, ज्या नागरिकांना फटाके फोडायचे आहे त्यांनी, रात्री आठ ते दहा या कालावधीच फटाके फोडावेत. तसेच, या निर्देशांचे पालन काटेकोरपणे व्हावे यासाठी स्थानिक प्रशासनाने नजर ठेवावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी राज्यभर विशेष पथके स्थापन केली आहे. पोलीसांच्या कडक निगराणीमुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असला तरी, काही ठिकाणी अद्यापही फटाके फुटत आहेत.