Shivling installed by a Artisan (PC - Twitter)

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये जगप्रसिद्ध अष्टमुखी भगवान पशुपतीनाथ महादेव मंदिर आहे. या ठिकाणी सहस्त्रेश्वर महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या शिवलिंगाची गोलाई आणि लांबी 6.50 फूट सांगितली जात आहे. शिवाचे हे नवीन रूप जलधारी म्हणजेच जिल्हारी येथे क्रेनच्या साहाय्याने स्थापित केले जाणार होते. त्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. प्रशासनाने पीडब्ल्यूडी, पीएचई, जिल्हा पंचायत यासह सर्व विभागांच्या अभियंत्यांना पाचारण केले. पण हे शिवलिंग जिल्हारीवर कसे आणायचे हे कोणी सांगू शकले नाही. यानंतर एका मुस्लिम कारोगिराने मंदिरात शिवलिंग बसवण्याची जबाबदारी घेतली.

जलधारीमध्ये शिवलिंग बसवताना अनुभवी अभियंत्यांना घाम फुटला, तेव्हा तेथे काम करणाऱ्या मकबूल हुसेन अन्सारी या गवंडी कारागिराने या कामात मदत करू, असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर मकबूल यांनी अभियंत्यांना कल्पना दिली की बर्फावर शिवलिंग ठेवल्यास बर्फ वितळण्यासोबतच शिवलिंग हळूहळू जलधारीच्या आत जाईल. (वाचा - Telangana: सरकारी बसमध्ये प्रवास करण्यासाठी कंडक्टरने कोंबड्याचेही आकारले भाडे, पहा व्हिडिओ)

मकबूल हुसेन यांची ही कल्पना सर्वांनाच आवडली. त्यानंतर बर्फाची ऑर्डर देऊन गोलाकार आकारात कापून बर्फाच्या तुकड्यांवर शिवलिंग ठेवले. मग पाहिलं बर्फ वितळताच शिवलिंगाने जागा घेतली. आता सगळेच मिस्त्री मकबूल हुसैन यांचे कौतुक करत आहेत. गरिबीमुळे मकबूल कधीच शाळेत गेले नाहीत. त्यांनी सौदी अरेबियात 8 वर्षे मेकॅनिक म्हणून काम केले आहे. तसेच मकबूल यांना अनेक मंदिरे बांधण्याचा अनुभव आहे.

मकबूलने काही मिनिटांतच अभियंत्यांची ही समस्या सोडवली. मकबूल यांच्यामुळे जलधारीत शिव सहस्त्रेश्वर महादेवाची स्थापना झाली. मकबूल म्हणतात की, अल्लाह एकच आहे आणि मला खूप आनंद होत आहे की हे उदात्त काम माझ्याकडून होऊ शकले. हे शिवलिंग 1500 वर्षांपूर्वी दशपूरच्या होळकर सम्राटाच्या काळात चुना वाळूच्या दगडाने बनवले गेले. हे शिवलिंग शिवना नदीतून सापडले होते. याशिवाय अष्टमुखी पशुपतीनाथाची मूर्तीही शिवना नदीतून सापडली. शिवलिंगासाठी जलधारी गुजरातमधून बनवण्यात आली होती. ज्याचे वजन सुमारे साडेतीन टन असून शिवलिंगाचे वजन सुमारे दीड टन आहे.

या कामात गुंतलेले अभियंता दिलीप जोशी सांगतात की, शिवलिंगाचे वजन दीड आणि जलधारी साडेतीन टन आहे. यातील सर्वात मोठी तांत्रिक अडचण म्हणजे चारही बाजूने खांब असल्याने क्रेन आत येऊ शकली नाही. तसेच शिवलिंग दुसऱ्या क्रेनने बसवले जात नव्हते. परंतु, मकबूल यांची कल्पना सर्वांसाठी सोप्पी आणि आनंददायी ठरली.