conductor charged a hen for traveling in a government bus (PC - Twitter)

Telangana: सराकरी बसमध्ये प्रवास करताना भाडे भरावे लागते. तुम्हीही तिकीट काढून बसमधून प्रवास केला असेल, पण तेलंगणामध्ये असे काही घडले की, लोकांना आश्चर्य वाटले आहे. येथे कोंबडीलाही बसमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट भाडे द्यावे लागले आहे. बस कंडक्टरने कोंबडीचे तिकीट कापून भाडे वसूल केले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (TSRTC) बसमध्ये प्रवास करण्यासाठी एका कोंबड्याला 30 रुपये भाडे मोजावे लागत आहे.

वृत्तानुसार, तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील TSRTC बस कंडक्टरने बसमध्ये प्रवास करणाऱ्या कोंबडीचे तिकीट कापले. कंडक्टरने कोंबडीच्या मालकाला भाडे भरण्यास सांगितले आणि प्रवाशाचे तिकीट काढून त्याच्याकडून 30 रुपये घेतले. तिरुपती पेड्डापल्लीहून करीमनगरला जाणार्‍या बसमध्ये एक प्रवाशी कोंबडा घेऊन चढला. सुलतानाबादला जाण्यासाठी तो बसमध्ये चढला. बस कंडक्टरने मोहम्मद अली या प्रवाशाला कोंबडीचे तिकीट काढण्यास सांगितले. काही वेळ दोघांमध्ये वाद झाला, मात्र बस कंडक्टरने मान्य न केल्याने त्याला कोंबडीच्या तिकिटाचे 30 रुपये द्यावे लागले. (वाचा - Viral Video: बर्फातून तयार केला विशाल अॅनाकोंडा, व्हिडिओ पाहून साप खरा की खोटा यावर विश्वास बसणार नाही)

बसमधील एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही माहिती टीएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोंबडीचे तिकीट कापण्याऐवजी कंडक्टरने प्रवाशाला कोंबडी घेऊन खाली उतरण्यास सांगायला हवे होते. TSRTC बसमध्ये जनावरांना परवानगी नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि कंडक्टरकडून स्पष्टीकरण मागवले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

याआधीही कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका कोंबडीकडून तिकीट कापून 52 रुपये भाडे आकारण्यात आले होते. ही बाब यावर्षीच्या जानेवारी महिन्याशी संबंधित आहे. बसमध्ये कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या महिलेला कोंबडीचे अर्धे तिकीट देण्यास सांगण्यात आले. भाड्यानुसार बस कंडक्टरने त्याच्याकडून 52 रुपये घेतले होते.