बॉलिवूड कलाकारांवर आपल्या प्रति आवड किंवा प्रेम निर्माण होणे ही अत्यंत साधी गोष्ट आहे. मात्र एखाद्या कलाकारावरील प्रेम दुसऱ्या व्यक्तीला न आवडणारे ठरल्यास त्याच्यावरुन वाद झाल्याचे सुद्धा दिसून आले आहेत. अशाच पद्धतीचा किस्सा घडला आहे. तर एका विवाहित महिलेला अभिनेता हृतिक रोशन याच्यावर क्रश असल्याने तिच्या नवऱ्याला या गोष्टीची प्रचंड चीड येत असे. त्यामुळे त्याने बायकोची याच कारणावरुन हत्या करत स्वत: सुद्धा गळफास लावून केल्याची धक्कादायक घटना न्यूयॉर्क येथे घडली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या गोष्टी चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.
भारतीय वंशाचे लग्न झालेले दिनेश्वर बुद्धीदात आणि डोनी डोजॉय यांच्यामध्ये लग्नाच्या सुरुवातीपासून वाद होतो. मात्र डोनी हिला हृतिक रोशनवर क्रश असल्याच्या कारणामुळे त्याला त्याचा संताप यायचा असे त्यांच्या मित्रांनी स्पष्ट केले आहे. पती, दिनेश्वर बुद्धीद हा अत्याचारी व नियंत्रित म्हणून ओळखला जात होता, इतका की हत्येची घटना घडली तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला रोखण्याचे सांगितले. तसेच ऑगस्ट महिन्यात डोनी हिला इमारती मध्येच दिनेश याने कानशीलात लगावली होती. त्यानंतर डोनी ही घर सोडून निघून गेली होती. मात्र आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वीच दिनेश्वर याने आपली चुक कोर्टात कबुली केली असल्याचे न्युयॉर्क पोस्ट मधून सांगण्यात आले आहे.(पुणे: Dry Day दिवशी 'ऑनलाईन' दारू मागवणं पडलं महागात; तरूणाने 'या' चूकीमुळे गमावले 50 हजार 778 रुपये)
दिनेश्वर याने हॉवर्ड येथील बीचवर जाण्यापूर्वी शुक्रवारी बायकोची क्वीन्सच्या घरी हत्या केली. त्यानंतर बायकोची हत्या केल्यानंतर त्याने स्वत: ला झाडाला लटकवत आत्महत्या केली. रिपोर्टनुसार त्याच्या घराची किल्ली फ्लॉवर पॉट खाली ठेवण्यात आली होती. मात्र दिनेश्वर याने डोनी हिची नेमक्या कोणत्या कारणावरुन हत्या केली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याच्या मित्रांनी सांगितले की, हृतिक रोशन डोनी हिला आवडत असल्याने त्याला चीड येत असे. तर जेमीनी लॉन्च कराओके सिंगर माला रामधनी हिने असे सांगितले की, डोनी हिला हृतिक रोशन याची गाणी आणि चित्रपट फार आवडायचे. मात्र दिनेश्वरला या वागण्यामुळे तिचा राग येत असे. मात्र दिनेश्वर याचे डोनी हिच्यावर प्रेम असल्याचे ही त्याच्या मित्रांनी स्पष्ट केले आहे.