पुण्यामध्ये शनिवार (9 नोव्हेंबर) दिवशी ऑनलाईन दारू मागवणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. दरम्यान काल 136 वर्ष जुन्या रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये 'ड्राय डे' जाहीर करण्यात आला होता. पण याबाबत माहिती नसलेल्या एका व्यक्तीला दारू मिळाली नाही पण सोबतच सुमारे 50 हजार 778 रूपायांचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यामातून गंडा घालण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी संबंधित व्यक्तीने हिंजवडी पोलिसा स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. असे नेटवर्क 18 लोकमतच्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
बावधन येथे राहणार्या 32 वर्षीय पियाली दुलालकर यांनी शनिवारची सुट्टी असल्याने ऑनलाईन माध्यमातून दारू ऑर्डर केली. या ऑनलाईन व्यवहारामध्ये पियाली यांच्या मोबाईलवर SMSच्या माध्यमातून एक ओटीपी आला. मात्र हा ओटीपी नेमका कशाचा होता हे बघता अनोळखी व्यक्तीला शेअर करण्यात आल्याने त्यांच्या अकाऊंटमधून 50 हजाराहून अधिक रूपयांची रक्कम गेली आहे.
पियाली यांनी वाईन आणि बिअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन घुले वाईन शॉप यांचा मोबाईल नंबरवर फोन केला तेव्हा 'ड्राय डे' असल्याने शॉप बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण ऑनलाईन खरेदी केल्यास घरपोच पाठवली जाईल असे पियाली यांना सांगण्यात आले. यानंतर एक ओटीपी त्यांना आला.पण हा ओटीपी नेमका कशाचा आहे हे पाहता त्यांनी तो शेअर केला आणि काही वेळातच त्यांच्या अकाऊंटमधून 31,777 व 19001 अशी दोन ट्रान्झॅक्शन झाली आणि क्षणात 50 हजाराहून अधिकचा फटका बसला.