एक 12 वर्षांच्या मुलाने युट्यूब व्हिडीओ (YouTube video) पाहून स्वतः द्राक्ष वाईन (Grape wine) बनवली. त्यानंतर त्याच्या एका मित्राला पाजली. ज्याला नंतर ते प्यायल्यानंतर अस्वस्थता आणि उलट्या झाल्या. त्याला जवळच्या चिरायंकीझू (Chirayankizu) येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. वाइन प्यायलेल्या मुलाची आणि त्याच्या एका वर्गमित्राची प्रकृती स्थिर असून त्याला नंतर रुग्णालयातून सोडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी तेथील एका सरकारी शाळेत ही घटना घडली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

चौकशीदरम्यान, मुलाने कबूल केले की त्याने आई-वडिलांनी विकत घेतलेल्या द्राक्षांचा वापर करून वाईन बनवली होती. ते म्हणाले की, त्यांनी स्पिरिट किंवा इतर कोणत्याही अल्कोहोलचा वापर केला नाही. वाईन तयार केल्यानंतर, त्याने ती बाटलीत भरली आणि यूट्यूब व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती जमिनीखाली गाडली, अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. पोलिसांनी शाळेत आणलेल्या बाटलीतून वाइनचे नमुने गोळा केले आणि येथील स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने रासायनिक तपासणीसाठी पाठवले, असे त्यांनी सांगितले. हेही वाचा WB SSC Scam: Arpita Mukherjee घरातील धाडेमध्ये Sex Toys देखील जप्त? रिपोर्ट पाहून सोशल मीडीयातही चर्चा

वाईनमध्ये स्पिरिट किंवा इतर कोणतेही अल्कोहोल मिसळले होते की नाही हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. असे काही असल्याचे आढळल्यास, आम्हाला बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा लागेल, अधिकारी पुढे म्हणाला. पोलिसांनी मुलाच्या पालकांना आणि शाळेच्या अधिकाऱ्यांना त्याच्या कृत्याच्या कायदेशीर परिणामांची माहिती दिली.