WB SSC Scam: Arpita Mukherjee घरातील धाडेमध्ये Sex Toys देखील जप्त? रिपोर्ट पाहून सोशल मीडीयातही चर्चा
Partha Chatterjee with Arpita Mukherjee

पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी ( Partha Chatterjee) यांच्या अटकेनंतर अभिनेत्री आणि पार्थ यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्या घरातून 50 कोटींची रक्कम आणि सोनं ईडीने ताब्यात घेतल्याने सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे. अशामध्ये आता या घबाडासोबतच अर्पिताच्या घरातून सेक्स टॉय देखील जप्त करण्यात आले आहे का? याबाबत सोशल मीडीयात चर्चा रंगत आहे. सोशल मीडीयामधील पोस्ट आणि अफवांवर विश्वास ठेवला तर किमान 2 सेक्स टॉय जप्त करण्यात आली आहेत.

पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता सध्या ईडी च्या अटकेमध्ये असून त्यांचं नाव शिक्षक नोकर भरतीच्या घोटाळ्यामध्ये आले आहे. 2016 आणि 2021 मध्ये पार्थ चॅटर्जी हे शिक्षण मंत्री होते.

ईडी कडून 27.9 करोडची रक्कम, सोनं आणि 4.31 करोडची परदेशी चलनं आढळली आहेत. यापूर्वीदेखील अर्पिताच्या घरातून 21 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. नक्की वाचा: WB SSC Recruitment Scam: Partha Chatterjee च्या निकटवर्तीय Arpita Mukherjee च्या घरी 18 तासांच्या ED कारवाईत 10 ट्रक्स भरून ऐवज, सोनं जप्त .

सोशल मीडीयात चर्चा

अभिनेत्री श्रीलेखा मित्राची प्रतिक्रिया

पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या संबंधांवरील चर्चा मागील काही दिवसांत वाढल्या आहेत त्यातच आता सेक्स टॉय बाबतचं वृत्त समोर आल्यानं त्याबाबत गूढही वाढलय.

ईडी कडून उद्योगपती मनोज जैन यांच्या Ballygunge येथील घरातही धाड टाकण्यात आली होती. जैन हे पार्थ चॅटर्जींच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईनंतर आता ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री पदी असलेल्या पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले आहे.