WB SSC Recruitment Scam: Partha Chatterjee च्या निकटवर्तीय Arpita Mukherjee च्या घरी 18 तासांच्या ED कारवाईत 10 ट्रक्स भरून ऐवज, सोनं जप्त
ED | Twitter/ANI

अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee)यांच्या निवासस्थानामधून ईडीने तब्बल 28 कोटींची रक्कम आणि 5 किलो सोनं जप्त केले आहे. अर्पिताच्या पश्चिम बंगाल मधील नॉर्थ 24 परगणा या निवासस्थानी ईडी ने ही कारवाई केली आहे. अर्पिता मुखर्जी ही शालेय शिक्षकांच्या भरती घोटाळ्यामध्ये (WB SSC Recruitment Scam) चर्चेत आहे. अर्पिताच्या घरी सापडलेल्या रक्कमेची मोजणी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती. आता अर्पिताकडील रक्कम 50 कोटीच्या घरात गेली आहे. मागील आठवड्यामध्येच अर्पिताच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावरील छापेमारीमध्ये 20 कोटी रोकड सापडली होती.

अर्पिताच्या घरी ईडीने तब्बल 18 तास धाड टाकून कारवाई केली आहे. तिची चौकशी केल्यानंतर Belghoria मधील फ्लॅट्स वर देखील कारवाई करण्यात आली. पैसा आणि सोनं मिळून 22 कोटींचा ऐवज एकत्र सापडला आहे. Partha Chatterjee, Arpita Mukherjee च्या घराचा उल्लेख 'मिनी बॅंक' असा करत असल्याचा दावा आहे. नक्की वाचा:  Mithun Chakraborty: ममता बॅनर्जी यांना 'एकनाथ शिंदे फॅक्टर'चा धोका? TMC चे 38 आमदार भाजपच्या संपर्कात: मिथुन चक्रवर्ती .

ANI वृत्तसंस्थेकडून शेअर करण्यात फोटोंमध्ये ईडी अधिकारी जमा केलेली रक्कम ट्र्क्स मधून घेऊन जात असल्याचं दिसलं आहे. यामध्ये 10 ट्र्क्सचा समावेश आहे. Arpita Mukherjee ही तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री Partha Chatterjee च्या निकटवर्तीय आहेत. Partha Chatterjee यांना मनी लॉडरिंग केस मध्ये ईडीकडून यापूर्वीच अटक केली आहे.