अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी पश्चिम बंगालच्या (West Bengal) राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पाठिमागच्या वर्षी राजकारणात प्रवेश केलेल्या या अभिनेत्याने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना महाराष्ट्रातील 'एकनाथ शिंदे फॅक्टर' (Eknath Shinde factor) चा सामना करावा लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. चक्रवर्ती यांनी दावा केला आहे की, टीएमसी (TMC) म्हणजेच तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाचे 38 विधेयक भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातील 21 आमदार तर थेट आपल्याच संपर्कात असल्याचा दावाही मिथून चक्रवर्ती यांनी केला आहे. मिथून चक्रवर्ती यांच्या दाव्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर देशभराच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, मी आपल्याला एक ब्रेकिंग न्यूज देऊ इच्छितो. तृणमूल काँग्रेस पक्षाचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यापैकी 21 आमदार तर थेट माझ्याच (मथून) संपर्कात आहेत. एके दिवशी मी सकाळी उठलो आणि ऐकले की महाराष्ट्रात भाजप शिवसेना सरकार स्थापन होत आहे. जर हे महाराष्ट्रात होत असेल तर पश्चिम बंगालमध्ये का नाही? (हेही वाचा, West Bengal's Teacher Recruitment Scam: ममता बॅनर्जी यांचे निकटवर्ती पार्थ चॅटर्जी यांना अटक; शिक्षण भरती घोटाळा प्रकरण)
दरम्यान, मिथून चक्रवर्ती यांचा दावा खरा मानला तर तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार जरी भाजपमध्ये आले तरीही पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होऊ शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या 96 आमदार आहेत. त्यात तृणमूलचे 38 मिळाले तर तो आकडा 107 इतका होतो आहे. इतक्या आकड्यावर भाजपचे सरकार स्थापन होऊ शकत नाही. कारण, पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला जादूई आकडा 144 आहे. त्यामुळे भाजपला आणखी 37 आमदारांची गरज भासणार आहे.
मिथून चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की, टीएमसीचे नेते चोर आहेत. जनतेची मते घेऊन ते सत्तेवर आले आहेत. मात्र, आता राज्याची स्थिती या पातळीवर पोहोचली आहे की, केवळ देवच त्यांना वाचवू शकतो. भाजपविरोधात अत्यंत घाणेरडा प्रचार केला जात आहे. सांगितले जात आहे की, भाजप दंगली करते आहे. भाजप मुस्लिमांना पसंत करत नाही. कट करुन भाजपविरोधात असा प्रचार केला जातो. भाजपने पाठिमागील अनेक वर्षांमध्ये एकही दंगल केली नाही, असेही मिथून चक्रवर्तीय यांनी म्हटले आहे.