अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडी (ED) ने पश्चिम बंगालचे (West Bengal) विद्यमान उद्योगमंत्री पार्थ चटर्जी (Partha Chatterjee) यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात (West Bengal's Teacher Recruitment Scam) मनी लॉन्ड्रीग प्रकरणात त्यांना शनिवारी अटक करण्यात आली. पार्थ चटर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. चटर्जी यांचे निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अटकेची कारवाई करण्यात आली. कथीत शिक्षक भरती घोटाळा घडला तेव्हा पार्थ चटर्जी हे शिक्षणमंत्री होते.
ईडीने रोख रक्कम जप्त केल्यानंतर तृणमूल नेता पार्थ चटर्जी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. प्रदीर्घ काळ चौकशी केली. सांगितले जात आहे की, चौकशीदरम्यान पार्थ चटर्जी यांनी म्हणावे तसे सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रात्रभर चौकशी केल्यानंतर पार्थ चटर्जी यांना अटक करण्यात आली. त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. (हेही वाचा, Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर ईडीकडून जप्त)
ट्विट
#WATCH | Enforcement Directorate (ED) team arrests former West Bengal Education Minister, Partha Chatterjee from his residence in Kolkata. The team had been here since yesterday in connection with the SSC recruitment scam. pic.twitter.com/iGkfQNlF0X
— ANI (@ANI) July 23, 2022
पार्थ चटर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये उद्योग आणि महसूल मंत्री आहेत. कथीत शिक्षक भरती घोटाळा घडला तेव्हा पार्थ चटर्जी हे शिक्षणमंत्री होते. अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की, पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीयाकडून 20 लाख रुपये रोख आणि 20 फोनपेक्षा अधि फोन करण्यात आले आहेत. ईडी अधिकाऱ्यांना जप्त केलेला पैसा हा एसएससी घोटाळ्यातून आल्याचा संशय आहे.