बाबो! 66 वर्षीय व्यक्तीच्या 16 पत्नी, 151 मुले; दिवसातून 4 जणींच्यासोबत करतो Sex, 1000 मुलांना जन्माला घालायची आहे इच्छा (See Photos)
Misheck Nyandoro with his wives and kids (Photo Credits: Twitter)

लग्न झालेले पुरुष नेहमी चेष्टेने म्हणतात की, एक पत्नी सांभाळणेही कठीण आहे. मात्र विचार करा एखाद्या व्यक्तीला 16 बायका असतील तर त्याची काय अवस्था होत असेल. विश्वास बसत नाही ना? मात्र हे खरे आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या युगात झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) 66 वर्षीय मिशॅक न्यान्डोरो (Misheck Nyandoro) याला 16 बायका आणि 151 मुले आहेत. महत्वाचे म्हणजे फक्त मुले जन्माला घालणे हेच त्याचे सध्याचे काम आहे. 151 मुले असूनही या व्यक्तीला अजून मुले जन्माला घालायची आहेत. 2015 मध्ये त्याने शेवटचे लग्न करून ब्रेक घेतला होता मात्र आता 2021 मध्ये तो 17 व्या लग्नाची तयारी करत आहे.

मिरर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, विचित्र मान्यतांवर विश्वास ठेवणाऱ्या झिम्बाब्वे देशातील मिशॅक सांगतो की, आपल्याला 16 बायका आल्याने आपल्या सर्व पत्नींना संतुष्ट आणि समाधानी ठेवणे हेच आपले काम आहे. स्थानिक वृत्तवाहिनी ‘द हेराल्ड’ च्या म्हणण्यानुसार, वयाच्या 66 व्या नंतरही मिशॅकला तरूण स्त्रियांशी लग्न करायचे आहे, कारण त्याच्या मते त्याच्या आधीच्या बयाला यापुढे वेगाने मुले जन्मास घालण्यास सक्षम नाहीत. तसेच त्या आता त्याला शारीरिक संबंधांमध्येही समाधानी ठेऊ शकत नाहीत. येणाऱ्या काळात मिशॅक 17 वे लग्न करणार आहे. मृत्यूपूर्वी 100 बायका आणि 1000 मुले असावेत अशी त्याची इच्छा आहे.

मशोनालँड मध्य प्रांताच्या बायर जिल्ह्यात राहणारा मिशॅक म्हणतो की, त्याने स्वत:च्या शारीरिक संबंधासाठी एक वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार तो दररोज रात्री आपल्या चार बायकांना संतुष्ट करतो. 151 मुले असूनही आपल्यावर जास्त जबाबदारी नसल्याचे मिशॅक सांगतो. यातील अनेक मुले कमावती असल्याने त्याच्या खांद्यावर सेक्ससोडून इतर कोणतेही ओझे नाही. (हेही वाचा: संभोग न करता फक्त Oral Sex केल्याने 15 वर्षीय मुलगी गर्भवती; मासिक पाळीही आली नव्हती)

हे कुटुंब शेतीच्या माध्यमातून स्वत: ची गुजराण करते. मिशॅकची सहा मुले झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय सैन्यात नोकरी करतात, 2 मुले पोलिसांत काम करतात आणि 11 मुले वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. त्याच्या 13 मुली विवाहित आहेत. त्याच्या 23 मुलांचे लग्न झाले आहे, त्यापैकी एका मुलाने चार लग्न केले आहेत.