काय सांगता? संभोग न करता फक्त Oral Sex केल्याने 15 वर्षीय मुलगी गर्भवती; मासिक पाळीही आली नव्हती
Pregnancy (Photo Credit: Pixabay)

जगात अशा अनेक वैद्यकीय केस स्टडीज आहेत ज्यावर विश्वास ठेवणे जवळजवळ अशक्य आहे, मात्र त्या खऱ्या आहेत. आयएफएल सायन्सने (IFL Science) प्रकाशित केलेली अशीच एक केस स्टडी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या केस स्टडीनुसार एक 15 वर्षांची मुलगी शारीरिक संबंध (Sex) न ठेवता गर्भवती (Pregnant) झाली होती. या मुलीने फक्त मुखमैथुन म्हणजेच ओरल सेक्स (Oral Sex) केला होता. महत्वाचे म्हणजे या मुलीच्या शरीरात योनी (Vagina) नव्हती, नाही कधी तिला मासिक पाळी आली होती. मात्र जेव्हा तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला तेव्हा डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

ही केस स्टडी सप्टेंबर 1988 मध्ये ब्रिटिश जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स एण्ड गायनॉकोलॉजी या प्रकरणात प्रसिद्ध झाली होती. अहवालानुसार, एका 15 वर्षाच्या मुलीवर तिचा सध्याचा प्रियकर व पूर्वीचा प्रियकर यांच्या भांडणामध्ये चाकू हल्ला झाला होता. नक्की कोणी कोणावर हल्ला केला हे समजू शकले नाही, मात्र मुलीच्या डाव्या हाताला आणि पोटावर गंभीर जखम झाली होती. मुलीची अवस्था बघून डॉक्टरांनी तिच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेच्या वेळी तिचे पोट रिकामे होते. पोटात अन्न किंवा गॅस नव्हते. दहा दिवसांनी बरे झाल्यानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.

त्यानंतर, 278 दिवसांनी ती परत रुग्णालयात आली. यावेळी तिच्या ओटीपोटात वेदना होत होत्या व तपासणीमध्ये दिसून आले की ती गर्भवती आहे. डॉक्टरांना हे पाहून धक्काच बसला कारण, मुलीच्या शरीरात ब्लाइंड व्हजायना होती, जी फक्त 2 सेंटीमीटर खोल होती. म्हणजेच ही मुलगी संभोग करू शकत नव्हती आणि गर्भवतीही होऊ शकत नव्हती. डॉक्टरांनी या मुलीचे सिझेरियन ऑपरेशन केले व तिने निरोगी बाळाला जन्म दिला.

त्यानंतर, जेव्हा मुलगी बरी झाली तेव्हा तिला याबाबत विचारण्यात आले. तिने सांगितले की, तिला माहित आहे की तिला योनी नाही, म्हणूनच ती मुखमैथुन करत असे. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला त्याआधी ती आपल्या प्रियकरासोबत ओरल सेक्स करत होती. त्याचवेळी तिथे पूर्वाश्रमीचा प्रियकर आला व तिघांमध्ये भांडणे झाली आणि या भांडणामध्ये मुलीवर चाकू हल्ला झाला. मुलीने सांगितले की, तिला कधीच मासिक पाळी आली नाही, त्यामुळे जेव्हा तिचे पोट वाढू लागले तेव्हा तिने याकडे लक्ष दिले नाही. (हेही वाचा: महिलेने एकावेळी दिला 9 मुलांना जन्म; जाणून घ्या कोठे घडली 'ही' अनोखी घटना)

डॉक्टरांनी सांगितले की ती मुखमैथुनामुळे गर्भवती राहिली आहे. याचे कारण सांगताना ते म्हणाले की, कदाचित पोटातील जखमांमधून काही शुक्राणु (Spermatozoa) प्रजनन अवयवांपर्यंत पोहोचले असावेत. जास्त पीएच असलेल्या लाळने त्यांना तिथे पोहचण्यास मदत केली असेल. कारण जेव्हा चाकू हल्ल्याच्या जखमेची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुलीचे पोट रिकामे होते, म्हणजे शरीरात एसिड नव्हते. मुलगी हल्याच्या आधी ओरल सेक्स करत होती व यामुळेच ती गर्भवती राहिली.