एकाचं आईच्या गर्भाशयातून एकाचं वेळी दोन, तीन किंवा चार मुलांचा जन्म दिल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, जर एखाद्या महिलेने एकाच वेळी नऊ मुलांना जन्म दिला तर असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर? कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. मोरोक्कोमधील एका महिलेने मंगळवारी एकाच वेळी 9 मुलांना जन्म देऊन सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे ही सर्व मुलं पूर्णपणे निरोगी आहेत. माली सरकारने 25 वर्षांच्या हलिमा सीजेला 30 मार्चला चांगली देखभाल करण्यासाठी मोरोक्कोला पाठविले. पूर्वी असा विश्वास होता की, हलीमाच्या गर्भाशयात 6 मुले आहेत. एकाच वेळी 6 मुलांचा जन्म असामान्य आहे. तसेच 9 मुलांचा जन्म तर आणखीनचं असामान्य आहे.
मोरोक्कोच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते रचित कौधरी म्हणाले की, देशात अशा 9 मुलांच्या जन्माची माहिती आमच्याकडे नाही. परंतु मालीच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हलिमाने सीझेरियन शस्त्रक्रियेद्वारे पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला आहे. मालीचे आरोग्यमंत्री फांटा सिबी यांनी एएफपीला सांगितले की, आई व बाळ निरोगी आहेत. (वाचा - World's First Pregnant Mummy: शास्त्रज्ञांनी शोधून काढली जगातील पहिली गर्भवती ममी; 2000 वर्षांपासून गर्भ पोटातच आहे)
दरम्यान, अशा अनोख्या घटना खूप कमी वेळा आढळतात. नुकतेच, ब्रिटनमधील 21 वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिला. या बाळाला पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. या बाळाचे वजन पाहून सर्वांनाचं धक्का बसला.
5 किलो 800 ग्रॅम वजनाचे बाळ
गर्भधारणेचे हे प्रकरण यूकेच्या ऑक्सफोर्डशायरमधून समोर आले. येथे राहणारी 21 वर्षीय एम्बर कंबरलँड तिच्या गर्भधारणेबद्दल खूप उत्सुक होती. ज्या प्रकारे तिचे पोट फुगले होते, ते ते पाहून सर्वांना वाटलं की एम्बरच्या पोटात जुळी बाळ आहे. पण जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा सर्वांचा अंदाज चुकीचा ठरल्याचे सिद्ध झाले.
एम्बरच्या प्रसूतीनंतर सर्वांनाचं धक्का बसला. मुलाचे वजन पाच किलो 800 ग्रॅम होते. या मुलाला यूकेमधील दुसर्या सर्वात जड बाळाचा सन्मान मिळाला. या बाळाचे वजन पाहून सर्वजण थक्क झाले. यापूर्वी 2012 मध्ये ब्रिटनच्या एका महिलेने सर्वात जड मुलाला जन्म दिला होता. त्याचे वजन साडे 6 किलो होते.