World's First Pregnant Mummy: शास्त्रज्ञांनी शोधून काढली जगातील पहिली गर्भवती ममी; 2000 वर्षांपासून गर्भ पोटातच आहे
World's First Pregnant Mummy (संग्रहित संपादित प्रतिमा)

इजिप्तमध्ये (Egypt) सापडलेल्या ममींमध्ये (Mummy) बरीच मोठी रहस्ये लपलेली असतात. जणू काही या ममींच्याद्वारे इतिहासच आपल्याशी बोलत आहे. आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी अशा ममींवर रिसर्च केला आहे व त्यातून थक्क करणाऱ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. आताही पोलंडमधील शास्त्रज्ञांनी असेच एक रहस्य किंवा सत्य शोधून काढले आहे. जी ममी आतापर्यंत एका पुजाऱ्याची समजली जात होती, ती चक्क एका गर्भवती महिलेची (Pregnant Mummy) असल्याचे उघडकीस आले आहे. Warsaw Mummy Project अंतर्गत या प्रकारचा असा पहिला शोध लावला गेला आहे. म्हणजेच 2000 वर्षांपूर्वीची एका गर्भवती महिलेची ही पहिली ममी सापडली आहे. 2015 पासून ही टीम प्राचीन इजिप्शियन मम्मीवर कार्यरत आहे.

पोलंडचे संशोधक Marzena Ożarek-Szilke म्हणाले की, जगातील ही पहिली घटना आहे ज्यामध्ये गर्भवती महिलेची मम्मी इतक्या सुरक्षित स्थितीत आहे. प्रकल्प सहसंस्थापक Wojciech Ejsmond यांनी सीएनएनला सांगितले की, या ममीला 1826 मध्ये पोलंडमध्ये आणले गेले. त्यावेळी ती एका महिलेची असल्याचे मानले जात होते, परंतु 1920 च्या दशकात एका इजिप्शियन पुजार्‍याचे नाव त्यावर लिहिलेले आढळले. संशोधनादरम्यान, संगणक टोमोग्राफीच्या मदतीने या ममीच्या पट्ट्या न खोलात पुष्टी केली गेली की ती महिलेची आहे. या ममीमध्ये प्रायव्हेट पार्टस हे महिलेचे होते. (हेही वाचा: इस्राइल मध्ये Bonfire Festival दरम्यान चेंगराचेंगरीत 12 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, 100 हून जास्त जखमी)

यासह 3 डी इमेजिंगमध्ये लांब-कुरळे केस आणि स्तनांची पुष्टी केली गेली. संशोधक म्हणाले की, जेव्हा बाई मरण पावली तेव्हा तिचे वय 20 ते 30 वर्षे झाले असावे आणि गर्भ 26-30 आठवड्यांचा असेल. तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आले नाही आणि हे जाणून घेण्यासाठी पुढील तपासणीची आवश्यकता असेल. यामुळे तज्ज्ञांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे की, भृण गर्भवती महिलेच्या पोटामध्ये किती काळ राहू शकतो? तसेच ममी बनवण्यासाठी मृतांच्या अवयवांना काढले जाते मात्र त्यावेळी गर्भ का काढला नाही? हा प्रश्नही आहे. यामागे काही धार्मिक कारण असू शकते असा विश्वास आहे.