इस्राइल मध्ये Bonfire Festival दरम्यान चेंगराचेंगरीत 12 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, 100 हून जास्त जखमी
Israel (Photo Credits-Twitter)

इस्राइमध्ये धार्मिक सण बोनफायर दरम्यान खुप चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 12 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 100 हून जास्त जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेसाठी दु:ख व्यक्त केले असून नागरिकांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, माउंट मेरन येथे स्टेडिअम मधील सीट्स तुटून पडल्याने चेंगराचेंगरी झाली. न्यूज चॅनल 12 नुसार, चेंगराचेंगरीत 38 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.(ऑस्ट्रेलियात कोरोनाची लस घेतल्यानंतर आणखी 2 जणांचा मृत्यू)

यहूदी जगतातील सर्वाधिक पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या टॉम्ब येथे ही घटना घडली आहे. हजारो अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स यहूदी वार्षिक स्मरणोत्सवासाठी दुसरी शताब्दीच्या संत रब्बी शिमोन बार योचाई यांच्या कब्रस्थानी एकत्रित जमले होते. येथे रात्रभर प्रार्थना आणि डान्स सुरु होता. सोशल मीडियात पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत दिसणारे चित्र विचलित करण्यासारखे आहे. यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी एकमेकांच्या अंगावरुन धावत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस आणि पॅरामेडिक्स हे जखमींचा बचाव करताना दिसून आले.

Tweet:

देशात आपत्कालीन सुविधेच्या मेगन डेविड एडम यांनी असे म्हटले की, 44 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहा हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, ज्यावेळी काही लोक शिड्यांवरुन खाली घसरले तेव्हा ही घटना घडली आहे. त्यानंतर लोक एकमेकांवर पडल्याचे दिसून आले. एमडीएच्या प्रवक्तांनी असे म्हटले की, हे चित्र अतिशय भयंकर आहे. लोक बाहेर येण्याच्या प्रयत्नात चेंगरले गेले.(North Korea: अधिकाऱ्याने चीनकडून निकृष्ट दर्जाचा माल मागवला; संतापलेल्या Kim Jong Un ने दिली मृत्यूदंडाची शिक्षा)

दरम्यान, इस्राइलमध्ये कोरोना संबंधित निर्बंध हटवल्याननंतर अशा पद्धतीचे आयोजन प्रथमच करण्यात आले होते. देशात ही घटन अशा वेळी घडली आहे जेव्हा इस्राइलने यशस्वीपूर्ण लसीकरण मोहिम पार पाडली. माउंट मैरन मध्ये खासगी बोनफायर वर गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता बंदी घालण्यात आली होती.