ऑस्ट्रेलियात कोरोनाची लस घेतल्यानंतर आणखी 2 जणांचा मृत्यू
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स मध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर काही दिवसानंतरच आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. स्थानिक मीडियाच्या हवालानुसार गुरुवारी ही माहिती मिळाली आहे. न्यूज एजेंसी सिन्हुआच्या रिपोर्ट्सनुसार लस घेतल्यानंतर आठ दिवसानंतर 21 एप्रिलला पूर्वोत्तर एनएसडब्लूच्या रुग्णालयात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. व्यक्तीच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्याने त्याचा जीव गेला आहे. मात्र त्याच्या फुफ्फुसात कोणतीच समस्या नसल्याचे ही सांगण्यात येत आहे. स्थानिय मीडियाने असे म्हटले, अद्याप ही पुष्टी करण्यात आलेली नाही की त्याने कोणत्या ब्रँन्डची लस घेतली होती.

टीजीएने या प्रकरणी एका विधानात असे म्हटले की, लसीकरणानंतर मृत्यू झाल्यास टीजीएस त्याचा आढावा घेणार आहे. लस घेतल्यानंतर अशा पद्धतीची घातक समस्या समोर आली आहे. तर 71 वर्षीय व्यक्ती सुद्धा आधीपासून आजारी होता. एस्ट्राजनेकाची लस घेतल्यानंतर त्याचे सिडनीमध्ये मृत्यू झाला. हा व्यक्ती मृत्यूपूर्वी काही आजारांशी झगडत होता. एनएसडब्लू आरोग्य अधिकाऱ्यांद्वारे परिस्थितीचा तपास आणि लसीमुळे त्याचा मृत्यू झाला का याच्या चौकशीसाठी एक पॅनल तयार केले आहे. त्यानंतरच तपासाबद्दल टीजीएला सांगितले जाणार आहे. दरम्यान, टीजीएने पहिल्यापासूनच एस्ट्राजेनेका लस आणि 48 वर्षीय एनएसडब्लू महिलेच्या मृत्यूचा संबंध असल्याचे म्हटले होते. तिने लस घेतल्यानंतर तिच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता.(US: कोरोना विषाणूसाठी पूर्णतः लसीकरण झालेल्या लोकांना Mask घालण्याची गरज नाही; अमेरिकन प्रशासनाचा मोठा निर्णय)

एस्ट्राजेनेका लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या निर्माण होत असल्याची आणखी तीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 35 वर्षीय महिला, एक 49 वर्षीय व्यक्ती आणि एक 80 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. टीजीए यांनी असे म्हटले की, तिन्ही रुग्ण चिकित्सकिय रुपात ठिक आहेत. त्यांनी उपचारादरम्यान उत्तम प्रतिसाद दिला असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. टीजीएच्या रिपोर्टनुसार, एस्ट्राजेनेकाच्या लसीमुळे डोके दुखी, ताप येणे, पेशी दुखणे, थंडी वाजणे आणि थकवा जाणवणे अशा गोष्टी होतात. ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी आधीपासूनच एस्ट्राजेनेकाची लस ही 50 वर्षांहून अधिक वय असलेल्यांनाच द्यावी असे म्हटले आहे. तर फायजरची लस तरुणांना दिली जाणार आहे.