Tej Pratap Yadav | (Photo Credits: Instagram)

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे थोरले चिरंजीव तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) हे पुन्हा एकदा भगवान शंकर (Lord Shiva) अवतारात सोशल मीडियावर झळकत आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. ज्यात ते भगवान शंकराच्या आवतारात दिसत आहेत. हिंदी प्रदेशांतील पंचागानुसार पहिल्या श्रावणी सोमवारी तेज प्रताप यांनी आपला अवतार प्रताप आपल्या चाहत्यांना घडवला. भगवान शंकरासारखा वेश धारण करत त्यांनी रुद्राभिषेक केला. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही तेज प्रताप यांनी आपला फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. जो जोरदार व्हायरल होत आहे.

या आधीही तेज प्रताप यांनी भगवान शंकरासारखा वेश धारण केला होता. त्याही वेळी त्यांचे हे रुप भलतेच लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या या रुपाची लोकचर्चा प्रदीर्घ काळ ठरली होती.

तेजप्रताप यादव इन्स्टाग्राम फोटो

आपल्या हटके अंदाजासाठी तेज प्रताप त्यांच्या चाहत्यामध्ये जोरदार प्रसिद्ध असतात. कधी ते स्वत:ला भगवान शंकराच्या रुपात दर्शवतात तर, कधी भगवान श्रीकृष्णाप्रमाणे वेश धारण करतात. ये वेळी 22 जुलै रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी त्यांनी भगवान भोलेनाथांची पूजा-अर्चा केली. या वेळी त्यांनी पांढरे धोत शरीरावर परिधान केले होते. तसेच, अंगाला भरपूर प्रमाणात भस्मही फासले होते. तसेच वाघाचे कातडे असलेल्या वस्त्रावर त्यांनी भगवान शिवचे रुप धारण केले आहे. (हेही वाचा, अभिनेत्री, TMC MP नुसरत जहां हिचा फिटनेस फंडा; अर्धा तास योगा, जेवणात मासे, प्रकृती एकदम सडपातळ, घ्या जाणून)

तेजप्रताप यादव इन्स्टाग्राम व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Har Har Mahadev 🙏🙏

A post shared by Tej Pratap Yadav (@tejpratapyadavrjd) on

दरम्यान, गेल्या वर्षी श्रावण महिन्यात तेज प्रताप यादव हे देवघर स्थिती बाबा वैद्यनाथ धाम येथे गेले होते. तेथे त्यांनी भगवान शिवचे दर्शन केले. शिवदर्शनास जाण्यापूर्वी त्यांनी पटना येथील शिवालयात पूजा-अर्चना केली. त्यानंतर त्यांनी भगवान शंकराचा वेश धारण करुन काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले.