अभिनेत्री, TMC MP नुसरत जहां हिचा फिटनेस फंडा; अर्धा तास योगा, जेवणात मासे, प्रकृती एकदम सडपातळ, घ्या जाणून
Nusrat Jahan | (Photo credit: Instagram)

बंगाली अभिनेत्री (Bengali Actresses) नुसरत जहां ( Nusrat Jahan) ही तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या तिकीटावर बशीरहाट लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून संसदेत पोहोचल्या आणि तिच्याविषयी देशभरात चर्चा सुरु झाली. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये तिची कामगिरी, सौंदर्य, आणि फिटनेस यावर भरभरुन लिहीलं, बोललं गेलं. कधी कपड्यांवरुन तर कधी आपल्या खासगी आयुष्यावरुन नेहमीच ती चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावरही ती जोरदार कार्यरत असते. प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावरही तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. खासदार झाल्यानंतर तिला अवघा देश ओळखू लागला. विशेष म्हणजे तिचा फिटनेस आणि सौंदर्य हे अनेकांच्या आकर्षणाचे विषय ठरले. अनेकांना तिच्या फिट बॉडीचे रहस्य जाणून घ्यावेसे वाटले. आज आपणही आपण जाणून घेऊयात अभिनेत्री आणि तृणमूल खासदार नुसरत जहां हिच्या फिटनेसचे रहस्य.

नुसरत जहां यांनी नुकतीच एका मीडिया हाऊससोबत संवाद साधला. या संवादात तिने सांगितले की, तिला बंद खोलीत एक्सरसाइज करणे अजिबात आवडत नाही. भल्या पहाटे उठून खुल्या आकाशाखाली एक्सरसाइज करणे तिला प्रचंड आवडते. (हेही वाचा, Vaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल)

Nusrat Jahan | (Photo credit: Instagram)

नुसरत जहां हिचा आवडता एक्सरसाईज म्हणजे रनिंग. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्डियो आणि योगाचा आसरा घेते. दररोज किमान अर्धा तास योगा आणि धावने तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे.

Nusrat Jahan | (Photo credit: Instagram)

डाएट बद्दल बोलायचे तर, त्याबाबत ती प्रचंड दक्ष असते. दिवसाची सुरुात नुसरत जहां ही ग्रीन टी घेऊन करते. ब्रेकफास्ट घेताना तिचा खास असा काही दंडक असत नाही. की, नाष्ट्याला अमूकच पदार्थ हवा वैगेरे. वेळ, काळ आणि ठिकाण यावरुन तिचा नाष्टा बदलत असतो.

Nusrat Jahan | (Photo credit: Instagram)

नुसरत हिला बेरीज (Berries) हे फळ फार आवडते. Berries फळात एंटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच, ती ऋतुनुसार उपलब्ध होणारी फळेही सेवन करते.

Nusrat Jahan | (Photo credit: Instagram)

नुसरत हिला जेवनात भात, मासे, करी आणि दही हे दररोज हवेच असते. नुसरत आपले खाण्याचे पदार्थ ओलिव तेलात बनवते.

Nusrat Jahan | (Photo credit: Instagram)

संध्याकाळचा नाष्टाही नुसरत कटाक्षाने करते. संध्याकाळच्या नाश्ता ती अगदी हलका घेते. रात्रीचा आहार म्हणून सूप आणि बॉयल्ड चिकन घेते. तो तिच्या डाएटचा भाग आहे.

Nusrat Jahan | (Photo credit: Instagram)

फिटनेसच्या बाबतीत शिल्पा शेट्टी ही नुसरत जहाहिचा आदर्श आहे. नुसरत सांगते की, वयाच्या तुलनेत शिल्पा शेट्टी प्रचंड फिट आहे. हेल्दी असूनही तिच्या शरीरावर एक इंचदेखील फॅट नाही.