निळ्या ग्रहाच्या तुलनेत लाल ग्रह हा अर्धा आहे. पृथ्वीचा व्यास 7,926 असून मंगळ ग्रहाचा व्यास 4,220 एवढा आहे. परंतु मंगळ ग्रहाचे वजन हे पृथ्वीच्या दहाव्या हिस्सा एवढे आहे.
जिथे पृथ्वीला सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात. तिथे मंगळ ग्रहाला 687 दिवस लागतात. त्यामुळे मंगळ ग्रहावर 687 दिवसांचे एक वर्ष असते. तर मंगळावरचा एक दिवस म्हणजे 24 तास 37 मिनिटे होय.
पृथ्वीच्या तुलनेत मंगळ ग्रहावर गुरुत्वाकर्षणाची शक्ती खूप प्रभावी आहे. म्हणजे पृथ्वीवरील 100 पाऊंड ( 45.3 किलो) वजनाचा मनुष्य, मंगळ ग्रहावर 38 पाऊंड ( 17.2 किलो) वजनाचा होतो.
मंगळावर दोन चंद्र आहेत. तर एक चंद्राचे नाव 'फोबोस' असून त्याचा व्यास 13.8 आहे. तसेच दुसऱ्या चंद्राचे नाव 'डेमियोस', ज्याचा व्यास 7.8 आहे.
मंगळ ग्रहावर 96% कार्बन डायऑक्साईड, 1.93% आर्गन, 0.14 ऑक्सिजन आणि 2% नायोट्रजनचे प्रमाण असते. त्याचबरोबर तेथील वातावरणात कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण ही आढळून आले आहे.