सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारचा मॅसेज व्हायरल व्हायला केवळ क्षणार्धाचा अवकाश पुरतो पण व्हायरल मॅसेजची (Viral Message) सत्यता न तपासता आपली वैयक्तिक माहिती उघड केल्यास तुमच्या खिशाला आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आजही व्हाट्सऍप (Whatsapp) सारख्या माध्यमातून 'अमुक लिंक वर क्लिक करा आणि फायदा मिळवा' असे मॅसेज सर्रास पाहायला मिळतात. आयपीएल 2019 (IPL2019) मध्ये विजयी झालेल्या मुंबई इंडियन्स (mummbai Indians) संघाची कामगिरी सेलिब्रेट करण्यासाठी जिओ (Jio) या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीतर्फे ग्राहकांना 399 रुपये किंमतीचा तीन महिन्यांचा रिचार्ज व टीमचा टीशर्ट मोफत मिळणार आहे अशा आशयाचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. JIO ची खास HAPPY NEW YEAR OFFER,399 च्या रिचार्जवर मिळणार पूर्ण कॅशबॅक
पण या मॅसेजमधील स्कीमची कोणतीही अधिकृत घोषणा जिओ तर्फे करण्यात आलेली नाही त्यामुळे यातील खोट्या लिंक्स वर क्लिक करून आपली माहिती लोकांनी देऊ नये असे आवाहन देणाराने एक सूचना पत्रक पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.
'फेक न्यूज'ला चाप लावण्यासाठी WhatsAppची मोहीम; प्रसारमाध्यमांतून जाहिरात
व्हायरल मॅसेज मध्ये सुरवातीला तुम्हाला एका लिंक वर क्लिक करून स्वतःची वैयक्तिक माहिती भरून मागितली जाते. ज्यात तुमचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकल्यावर मुंबई इंडियन्स संघाचा बॅनर असलेलं एक वेगळं पेज ओपन होतं. या पेजवरून तुम्हाला हा मॅसेज संपर्कांतील दहा नंबर वर पाठवायला सांगितलं जातं. शिवाय तुमच्याकडे जिओ नसल्यास तुमच्या मैत्रमैत्रिणींना याचा फायदा होऊ शकतो म्ह्णून या मेसेजला फॉरवर्ड करा असे सांगणारा एक ब्लॉगस्पॉट देखील जोडलेला आहे. मात्र ही लिंक हॅकर्स कडून बनवण्यात आलेली गूगलची फ्री वेबसाईट असू शकते त्यामुळे हा मॅसेज फेक असून यावर विश्वास ठेवू नये,असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कसे ओळखाल व्हायरल मॅसेजमधील फ्रॉड
-कोणत्याही वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करण्याआधी त्यातील HTTP आणि HTTPS उपसर्ग तपासून पाहा.
-कोणत्याही साईटवर पर्सनल माहिती भरू नका, ही माहिती इतर कंपन्यांना विकली जाऊ शकते .
-कॉपीराईट किंवा अधिकृत साईट्स सुरवातीला चेक करा.
-कंपनीचे नाव, माहिती, स्पेलिंग मधील चुका, इतर लिंक तपासून घ्या
-खोट्या कॉल्स मधून ही हा फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे नंबर ओळखणाऱ्या ऍप्सचा वापर करा